धक्कादायक… सूनेसोबत अनैतिक संबंधातून वडिलांकडून मुलाची हत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

म्हातारचळ लागलेल्या बापाने सूनेलाच आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्यातील अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या मुलालाच त्यांनी काटा काढल्याची बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील केळगावमध्ये ही घटना घडली.

[amazon_link asins=’B005LTPPBO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fcd133ef-8fc8-11e8-832e-63563c8efee8′]

आपला मुलगा प्रभाकर कोल्हे (वय ४५) हा १४ जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार दादाराव कोल्हे (वय ६६) यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे दिली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे तपास सुरु केला. तपासामध्ये पित्यानेच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि पोलीसही चक्रावून गेले.

दादाराव कोल्हे यांनी प्रभाकर यांची हत्या करुन आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि उकिरड्यात पुरले. त्यानंतर आपला मुलगा १४ तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार स्वत: वडिलांनीच दिली.