सोमवती अमावस्ये निमित्त श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना कऱ्हास्नान

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची पालखी सोमवती आमवस्ये निमित्त पांडेश्वर(ता.पुरंदर) येथे कऱ्हा स्नानासाठी गेली होती. सकाळी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची महापुजा पुजारी मनोज जगताप यांनी बांधली. त्यानंतर महाआरती करण्यात आली.

आमवस्ये निमित्त श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची पालखी नायगाव येथुन पांडेश्वर कडे प्रस्थान झाली. यावेळी गावातील ग्रामस्थ, तरुण, मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नायगाव ते पांडेश्वर साधारणत: ८ कि.मी.अंतर आहे. हे अंतर सर्वजन पायी चालतात. कोणत्याही वाहनांचा उपयोग करत नाहीत. पालखी घेतलेले ग्रामस्थ पायामध्ये कोणतेही पायताण घालत नाहीत. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची पालखी दर सोमवती अमावस्येला पांडेश्वर या ठिकाणी जात असते.

पालखी पांडेश्वर या ठिकाणी घेल्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना ग्रामस्थांनी स्नान घातले. त्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आरती झाली. पांडेश्वर येथे सोमवती अमावस्ये निमित्त राजुरी व पांडेश्वर येथील ही देवांच्या पालख्या आल्या होत्या. त्यांना ही भाविकांनी स्नान घातले व त्यांच्या ही आरती करण्यात आल्या. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची पालखी परत माघारी येत असताना पांडेश्वर येथील रहीवाशी शेंडगे बंधु यांच्या वतीने ग्रामस्थांना चहा देण्यात आला.

नायगाव मधील चौंडकरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद करण्यात आला होता.त्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची पालखी नायगाव कडे प्रस्थान झाली. नायगाव मध्ये आल्यानंतर ग्रामप्रदिक्षणा होऊन पालखी मंदिरात गेली व त्यानंतर आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.आशी माहिती राहुल कड यांनी दिली.

Visit : Policenama.com