मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् |
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: || श्रीमद्भगवद्गीता अ. ८ श्लोक. ५

अर्थ – भगवान म्हणतात, जो व्यक्ती अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करतो,
तो साक्षात माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् |
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभाविता: || श्रीमद्भगवद्गीता अ. ८ श्लोक. ६

अर्थ – भगवान म्हणतात, हे कान्तीपुत्र अर्जुना ! हा मणुष्य अंतकाळी ज्याचे
स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याचाच जन्म मिळतो.
कारण तो नेहमी त्याचेच चिंतन करीत असतो.