आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मधील ‘गबरू’ सोशल मीडियावर ‘रिलीज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा आगामी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील पहिले गाणे ‘गबरू’ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे इतर गाण्यांसारखे नसून त्यामध्ये हटके टच देण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे हनी सिंगच्या पंजाबी हिट गाण्याचे हे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. हे गाणे रोमीने गायले आहे आणि तनिष्क बागचीने हे गाणे रिक्रिएट केले आहे. या गाण्यामध्ये एक लग्न देखील दाखविण्यात आले आहे. आयुष्मान खुराना आणि चित्रपटामधील त्याचा पार्टनर जितेंद्र कुमार या गाण्यात मनसोक्त धमाल करताना दिसत आहे.

‘गबरू’ या गाण्यामध्ये आयुष्मान आणि जितेंद्रची आगळी वेगळी केमिस्ट्री दिसत आहे त्याचबरोबर गजराज यादव या दोघांची जोडी तोडण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. या गाण्यामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना आणि जितेंद्र एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहे. एकीकडे गजराज अथक प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे जितेंद्रची नजर आयुष्मानवरुन हटण्याचे नाव घेत नाही. त्यानंतर शेवटी दोघेही लिपलॉक करताना दिसले आहे.

हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील दोघांच्या लव्ह स्टोरीसोबतच गाण्याचे संगीतही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे म्हणले तर हा चित्रपट समलैंगिग विषयावर भाष्य करणारा आहे. यामध्ये आयुष्मान खुराना पहिल्यांदाच समलैंगिक मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

 

You might also like