हितेश सोनिकपासून वेगळी झाली ‘सिंगर’ सुनिधी चौहान ? पतीनं केला ‘खुलासा’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड सिंगर सुनिधी चौहान आपल्या पर्सनल लाईफमुळं सध्या चर्चेत आली आहे. अशी माहिती आहे की, ती आणि तिचा पती म्युझिक डायरेक्टर हितेश सोनिक एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यांचं 8 वर्ष जुनं लग्न लॉकडाऊनच्या काळात मोडलं आहे. या सगळ्यावर अद्याप सुनिधीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु पती हितेश सोनिकनं मात्र यावरील मौन सोडलं आहे.

हितेशनं या साऱ्या वृत्तांचं खंडन केलं आहे. याबाबत जेव्हा सुनिधीला विचारण्यात आलं होतं तेव्हा तिनं काहीही बोलण्यास नकार दिला होता. यानंतर आता पती हितेश म्हणतो, “अशा बेकार अफवांवर कोणतीही कमेंट करण्याची तिची इच्छा नसेल.”

आपल्या नात्याबद्दल बोलताना हितेश म्हणाला, “आम्ही सोबत राहत आहोत तेही एकाच छताखाली. मी घरकाम करण्यापासून तर न्यूज पेपर वाचण्यात व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळं आम्ही घरातील कामं वाटून घेतली आहेत. बहुतेक ती माझ्या घरातल्या कामांवर खुश नसेल म्हणूनच अशी स्टोरी बनत आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून हितेश आणि सुनिधी वेगळे रहात होते. परंतु ही गोष्ट त्यांनी लोकांसमोर येऊ दिली नाही. आता त्यांना याबद्दल काही विचारलं असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी सुनिधी आणि हितेश दोस्तांसोबत गोव्याच्या ट्रीपला गेले होते. तिथून परत आल्यानंतर दोघांमध्ये कटुता आली.

सुनिधी आणि हितेश यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. हे लग्न गोव्यात एका ग्रँड रिसेप्शनसहित झालं होतं.