धक्कादायक ! दहावीच्या मुलासोबतच्या प्रेमसंबंधातून सहावीतील मुलगी गर्भवती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – शासकिय आश्रमशाळेत शिकणारी इयत्ता सहावीतील मुलगी गर्भवती राहिल्याचा खळबळजनक प्रकार पेठ तालूक्यातील खरपडीतील एका आश्रमशाळेत उघडकिस आला आहे. धक्कादायक म्हणजे दहावीतील मुलाशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तिच्या पालकांनी हरसूल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पेठ तालुक्यातील राहणारे असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. मुलगी आश्रमशाळेत शिकण्यास आहे. आश्रमशाळेत नियमित मुलींची तपासणी होत असते. मात्र अधीक्षकांनाही हा प्रकार लक्षात आला नाही. रविवारी हा प्रकार उघडकिस आला आहे. दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्यानंतर ती गर्भवती राहिली असल्याचे समोर आले आहे. दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीची वैद्यकिय तपासणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे कुटुंबिय दोघांचंही लग्न लावून देण्यास तयार झाले आहे. मात्र, हरसूल येथे ग्रामीण रुग्णालय असताना त्र्यंबकेश्वर येथे वैदयकिय तपासणी करता येणार नाही म्हणत त्यांना परत पाठवून दिले आहे.