रात्री उपाशीपोटी झोपता का ? वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकांची लाईफस्टाईल अशी झाली आहे की, काही लोक रात्री जेवण न करताच झोपी जातात. अनेक लोक असेही आहेत जे वाढत्या वजनामुळं किंवा लठ्ठपणामुळं कंटाळूनही रात्रीचं जेवण करत नाहीत. तुम्हाला माहित आहे का आरोग्यावर याचे खूप गंभीर परिणाम होतात. याशिवाय उपाशी पोटी झोपल्यानं अनेक आजार होण्याचाही धोका वाढतो. उपाशीपोटी झाोपलं तर शरीराचं काय नुकसान होतं हे आपण आज जाणून घेणार आहोत.

1) एनर्जी कमी होते – अनेकांचा असा समज आहे की, रात्री शरीराला अन्नाची गरज नसते. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीर 24 तास एनर्जी प्रोड्युस करत असतं. प्रत्येक वेळी कॅलरीज बर्न करण्यात काम करत असतं. यासाठी शरीराला न्युट्रीएंट्सची गरज असते. फ्लोरिड स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितल्यानुसार, जे पुरुष रात्री झोपताना प्रोटीन शेकचं सेवन करतात ते इतरांच्या तुलनेत जास्त एनर्जेटीक असतात. तुम्ही जर रात्री उपाशीपोटी झोपलात तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवतो. कामाच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो.

2) मेटाबॉलिजमवर होतो परिणाम – जे लोक रात्री उशीरा पर्यंत झोपतात त्यांच्या मेटाबॉलिजमवर वाईट परिणाम दिसून येतात. याचा शरीरातील इंसुलिनच्या प्रमाणावरही परिणाम होतो. उपाशीपोटी झोपल्यानं कोलेस्ट्रॉल आणि थायरॉईड लेव्हलवरही परिणाम होतो. या सवयीमुळं अनेक आजार होण्याची शक्यता असते.

3) अनिद्रा – जर तुम्ही उपाशीपोटी झोपलात आणि जर रात्री तुम्हाला भूक लागली तर अशा वेळी तुम्हाला पोटदुखीचा त्रासही सहन करावा लागतो. यामुळं तुमची झोपही डिस्टर्ब होऊ शकते. जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर रात्री उपाशी पोटी झोपू नका.

4) वजन वाढतं – लठ्ठपणामुळं पीडित असणाऱ्या अनेक लोकांना असं वाटतं की, आपण जर रात्री उपाशीपोटी झोपलो तर वजन लवकर कमी होईल. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा एक मोठा गैरसमज आहे. हेल्थ एक्सरपर्ट सांगतात की, रात्री आहारात पचालया हलक्या अशाच पदार्थांचा समावेश करावा. परंतु काहीच न खाता झोपलात तर आरोग्याला नुकसान पोहोचतं आणि वजन कमी होत नाही.

5) शरीरात न्युट्रीशनची कमतरता – जर तुम्ही रात्री उपाशीपोटी झोपत असाल तर शरीरात न्युट्रीशन्सची कमतरता जाणवते. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, उत्तम आरोग्यासाठी शरीराला अनेक न्युट्रीएंट्सची गरज असते. परंतु उपाशी झोपलं तर शरीरात अनेक न्युट्रीएंट्सची कमतरता जाणवते. यामुळं अनेक आजार होण्याचा धोका असतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.