….म्हणून ‘वर्षा’ बंगला सोडला नाही तर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी पुन्हा येईन अशी गर्जना केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठ्या प्रमाणावर टिका झाली. शिवसेनेने पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर भाजपाकडून सुधीर मनगुंटीवार यांच्याकडून नेहमीच लवकरच गोड बातमी येईल असे सांगत होते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्व मंत्र्यांना त्यांचे कार्यालये खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी कार्यालये खाली केली होती.

असे असले तरी देवेंद फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला वर्षा हा सोडला नव्हता. त्यांनी दोन महिने राहण्याची परवानगी मागून घेतली होती. महाविकास आघाडी सत्तेवर येत असतानाही भाजपाकडून आमचेच सरकार येणार असे ठामपणे का सांगितले जात होते. हे आता लोकांना समजले. भाजपामधील अगदी मोजक्या जणांना याची कल्पना होती.

गोवा विधानसभेमध्येही भाजपाने काँग्रेसमध्ये फुट पाडून मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना शपथविधी केला होता. त्यानंतर गोमंतक पक्षात अशीच फुट पाडून मध्यरात्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उरकला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात रात्रीत राष्ट्रपती राजवट उठविण्याची प्रक्रिया पूर्ण करुन ती अतिशय गुपचुप मागे घेतली.

त्यानंतर कोणालाही काही समजायच्या आत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतरच हे सर्व समजले. हे सर्व आधीच ठरले असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडला नाही ना तसेच सुधीर मुनगंटीवार हे लवकरच गोड बातमी येईल, असे यामुळेच सांगत होते काय? असा प्रश्न सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना पडला आहे.

Visit : Policenama.com