…म्हणून ‘प्रियंका’ आणि ‘दीपिका’ची चौकशी करणार मुंबई पोलीस ! ‘हे’ प्रकरण भोवण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  मुंबई क्राईम ब्रँचनं आता फेक सोशल मीडिया फॉलोवर्स स्कॅमची चौकशी करायला सुरुवात केली आहे. तपास पुढे जात आहे तसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा यांच्यासंदर्भातही मोठा खुलासा समोर आला आहे. प्रियंका, दीपिकासह इतर 10 सेलिब्रिटींचं नाव फेक फॉलोवर्सच्या यादीत पुढं आलं आहे.

अनेक स्टार्स किंवा हाय प्रोफाईल लोक त्यांच्या फॉलोवर्स वाढवण्यासाठी फॉलोवर्स खरेदी करतात. या फेक फॉलोवर्सला इंस्टाच्या भाषेत Bots म्हटलं जातं. आता हा खुलासा समोर आल्यानंतर मुंबई पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. लवकरच ते प्रियंका आणि दीपिका यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार पुढील आठवड्यात यासंदर्भात चौकशी केली जाऊ शकते. या प्रकरणी 150 लोकांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. क्राईम ब्रँचनं काढलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि काही हाय प्रोफाईल लोकांना समावेश आहे अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या संदर्भाता 18 लोकांची चौकशी केली आहे. ज्या लोकांची चौकशी झाली आहे ते बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. यात कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, मेकअप आर्टीस्ट, कोरियोग्राफर आणि सहदिग्दर्शकाचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/B9ix9kUjrpc/

https://www.instagram.com/p/B9gJgmiD7kG/