शरद पवार यांच्या लोकसभा उमेदवारीवर सोशल मीडिया नाराज

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या उमेदवारीवरुन चर्चेला उधाण आले असता त्यांच्या उमेदवारीवर सोशल मीडिया नाराज असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः मोहिते पाटील समर्थक शरद पवार यांच्या उमेदवारीवर भलतेच नाराज असल्याचे समजते आहे. कारण मोहिते पाटील समर्थकांनी विजयसिंहचं माढ्यासाठी कसे योग्य आहेत हे मॅसेज आणि फोटोच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवार यांनी या आधी जेव्हा माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा त्यांनी म्हणावा असा विकास केला नाही. म्हणून लोक तेव्हा पासून आज तागायत त्यांच्यावर नाराज आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांना पाणी आणण्याचे आश्वासन शरद पवार यांनी २००९ च्या निवडणुकी निमित्ताने दिले होते. परंतु ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. म्हणून माढा मतदारसंघातील सांगोला तालुक्याची पाण्यासाठी १९७२ पासून सुरु असणारी लढाई अद्याप संपलेली नाही. अशीच काहीशी अवस्था मतदारसंघातील शेवटचा तालुका असलेल्या माणची आहे. तेथेही पाणी पोचवण्याचे आश्वासन पवारांनी निभावले नाही म्हणून त्यांच्यावर जाणत्या शेतकऱ्यांसहित तरुण मोठ्या प्रमाणात नाराज आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आले आहेत. त्यामुळे आज शरद पवार बेरोजगारीच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर टीका करत असल्याचे लोकांना आवडत नाही. कारण माढा मतदारसंघातील तरुण सोशल मीडियातून शरद पवारांना विचारू लागला आहे कि तुम्ही किती लोकांना नोकऱ्या दिल्या. टेंभुर्णीचा काही औद्योगिक भाग सोडला तर संबंध माढा मतदारसंघात प्रचंड बेरोजगारी आहे. त्यामुळे हे बेरोजगार शरद पवार यांच्या आगामी उमेदवारीवर नाराज आहेत.

शरद पवार माढ्यातून, सुप्रिया सुळे बारामतीतून तर पार्थ पवार मावळ मधून लढणार आहेत असा बातम्या प्रसारित होत आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या घराणेशाहीवर रोज सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करत आहेत. ‘तुम लढो हम सतरंज्या उचलते है’ असे म्हणून सोशल मीडिया पवारांच्या घराणेशाहीची टर उडवत आहे. एकंदरच शरद पवार यांच्या माढा लोकसभा उमेदवारीवरून लोक नाराज असल्याचे सोशल मीडिया दर्शवित आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us