अनुदान मिळत नसल्यामुळे उपोषणास बसण्यास परवानगी द्यावी : अविनाश अनेराये

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  खरीप हंगाम सन 2019 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यपालानी घोषित केलेल्या अनुदानाची रक्कम आजपर्यंत शेळगाव छत्री या गावास मिळत नसून ते अनुदान त्वरित त्वरित देण्यात यावे म्हणून शेळगाव छत्री चे युवा शेतकरी अविनाश अनेराये यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,कृषी मंत्री,नांदेड चे पालकमंत्री,नांदेड खासदार,नायगाव विधानसभा आमदार,जिल्हाधिकारी नांदेड,उपविभागीय अधिकारी बिलोली,तहसीलदार नायगाव,यांना निवेदनाद्वारे वेळोवेळी विचारणा केलीपण कुठल्याच प्रकारची यावर चौकशी झालेली नाही.

अगोदरच कोरणासारख्या महाभयंकर महामारी मुळे सन्माननीय शेतकरी बांधव अडचणीत आहे या अडचणीत शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मागून न्याय मिळत नसल्यामुळे मला उपोषणास बसण्याची वेळ येत आहे,उपोषणास बसण्यास परवानगी द्यावी असे निवेदन मी तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नायगाव बाजार यांना देण्यात आले आहे,शेतकरी उपोषणास बसल्यावर तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो.