PornHub ची फेमस ‘पॉर्नस्टार’ मिया खलिफाला इंटरनेटवरील तिचे सर्व XXX व्हिडीओ Delete करण्याची इच्छा ! परंतु …

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पॉर्न हबची प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा हिला आता तिच्या पॉर्न करिअरचा पस्तावा होत आहे. 2019 मध्ये तिनं एकटीनच आपल्या सेक्स व्हिडीओजनं 269 मिलियन्स व्ह्युज मिळवले होते. परंतु आता तिची इच्छा आहे की, इंटरनेटवरून तिचे हे सारे व्हिडीओज हटवले जावेत. अलीकडेच तिनं तिचं दु:ख व्यक्त करत सांगितलं की, पॉर्न इंडस्ट्रीत काम करणं हा तिचा निर्णय चुकिचा ठरला आहे. तिला आता याचा खूप पस्तावाही होत आहे. एकेकाळी मिया टॉपची पॉर्न स्टार होती.

मिया खलिफा हिनं इतर मुलींनाही सल्ला दिलाय की, त्यांनी या इंडस्ट्रीपासून दूर रहावं. तेच जास्त चांगलं राहिलं. सोशलवर चाहत्यांसोबत बोलताना मियानं सांगितलं की, तिन फक्त 11 पॉर्न व्हिडीओत काम केलं आहे. परंतु आता हे 11 व्हिडीओ आयुष्यभर एखाद्या वाईट स्वप्नांसारखे तिला घाबरवत राहतील. तिची इच्छा आहे की, हे व्हिडीओज आता इंटरनेटवरून डिलीट केले जावेत. परंतु आता मात्र ते शक्य नाही.

मिया सांगते तिनं 11 पॉर्न सिनेमातच काम केलंय. परंतु अ‍ॅडल्ट साईटवर तिच्या नावाचे 4000 हून अधिक व्हिडीओज आहेत. मियाचं पॉर्न करिअर जरी खूप लहान असलं तरी तिनं खूप पॉप्युलॅरिटी मिळवली आहे. ती सांगते केवळ एका पॉर्न व्हिडीओसाठी तिला लाखो रुपये ऑफर केल जात होते. परंतु तरीही तिनं असं केलं नाही.

मियानं हिजाब घालूनही पॉर्न व्हिडीओज शुट केले होते. ज्यानंतर तिला अनेक इस्लाम धर्माच्या समर्थकांनी धमकी दिली होती. यानंतरच तिनं या इंडस्ट्रीतून सन्यास घेतला होता.