Solapur Crime | राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची ‘गेम’

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | दुचाकीवरुन (Two-wheeler) जाणार्‍या दोघांना एका टेम्पोने (Tempo) धडक दिली. त्यात एका शिवसैनिकाचा मृत्यु (Death) झाला. हा अपघात (Accident) नसून राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या (Murder) केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)  चार कार्यकर्त्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तर, टेम्पोचालकाला अटक  (Arrest) केली आहे. सतीश नारायण क्षीरसागर (रा. सिद्धार्थनगर, मोहोळ) अशी हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. तर या अपघातात विजय सरवदे गंभीर जखमी झाले आहेत. (Solapur Crime | NCP workers murder Shiv Sainik due to political rivalry)

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे आणि टेम्पोचालक भैय्या असवले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र असले तरी त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन धुसफुस सुरु आहे. स्थानिक पातळीवर या पक्षांमध्ये वादावादी कायमच सुरु असते. त्याचे प्रत्यंतर बुधवारी रात्री आले.

मोहोळमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका चार महिन्यांपूर्वी पार पडल्या होत्या. शहरातील प्रभाग क्रमांक 8 व 9 मध्ये काही बोगस मतदार नोंदणी झाल्याची घटना सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे यांनी उघडकीस आणली होती. त्यांनी प्रांताधिकार्‍याकडे तक्रार केल्याने त्यांनी ही बोगस नावे कमी केली होती. तसेच नगर परिषदेच्या रमाई घरकुल आवास योजनेच्या (Ramai Gharkul Awas Yojana) 28 मंजूर फाईल गायब झाल्या होत्या. त्या फायलीबाबत शिवसेनेच्या या दोघा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या दोघांना तुझी फाईल मीच गडप केली आहे. जा तुला काय करायचे आहे ते कर, अशी धमकी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. तसेच फायरिंग करुन खल्लास करेन, अशी धमकीही त्यांना दिली होती. या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात राग होता. या घटनेच्या 4 महिन्यांनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सूड उगविला.

भैय्या असवले, संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे यांनी एकत्रित येऊन कट रचला. सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांना भैय्या असवले जेवायला बोलावले. जेवण करुन सतीश व विजय हे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरुन घरी जात होते. त्यांच्या पाठोपाठ भैय्या असवले याने टेम्पो वेगाने आणून त्यांच्या दुचाकीवर घातला. त्यात सतीश जागीच ठार झाला तर, विजय गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात नसून घातपात असून त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सतीश याच्या नातेवाईकांनी केली.
गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
पोलिसांनी केलेल्या तपासात हा अपघात नसून राजकीय वैमनस्यातून अपघात घडविल्याचे उघड झाले.
त्यानंतर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर १७ तासांनी नातेवाईकांनी सतीशचा मृतदेह ताब्यात घेतला.
मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Solapur Crime | NCP workers murder Shiv Sainik due to political rivalry