शरद पवारांच्या नावानं राज्यातील लोकांची दिशाभूल केली जाते : छगन भुजबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जर खरंच शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर त्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं असतं. आम्हाला सोबत घेऊन ते भाजपमध्ये गेले असते. त्यांच्या मनामध्ये तसं काहीही नव्हतं. पवार साहेबांनी सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जायचं ठरवलं होतं, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

भुजबळ पुढे म्हणाले, शरद पवारांच्या नावाने राज्यातील लोकांची दिशाभूल केली जात आहे. शरद पवारांना जर भाजपसोबत जायचे असते तर ते आम्हा सर्वांना घेऊन ते गेले असते, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच निवडणुकीमध्ये काँग्रेस हा आमचा सहयोगी पक्ष होता. त्यामुळे आम्ही आधी काँग्रेसला विश्वासात घेतले आणि नंतर शिवसेनेसोबत चर्चा केली. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. या अधिवेशनानंतर लगेच अगदी दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वाटते. तसेच सरकारच्या कामकाजांना काही अडचण येणार नाही, उगाचच लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी यावेळी केला.

Visit : Policenama.com

 

You might also like