दूरदर्शनंचं ‘रामायण’वरील ‘ते’ ट्विट पाहून लोकांना आठवली सोनाक्षी सिन्हाची KBC मधील Oops मुमेंट !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या दूरदर्शनवर त्याच चॅनलवरील अनेक जुन्या मालिका रिपीट टेलीकास्ट केल्या जाताना दिसत आहेत. रामानंद सागर यांचा रामायण हा शो 33 वर्षांनंतरही खूप लोकप्रिय ठरताना दिसत आहे. अलीकडेच दूरदर्शननं रामायण संबंधित असं ट्विट केलं आहे की, ज्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची ती Oops मुमेंट आठवली आहे जी बिग बी अमिताभ बच्चनचा शो कौन बनेगा करोडपती 11 मध्ये घडली होती.

दूरदर्शननं ट्विट केलं की, “हनुमान कोणासाठी संजीवनी बुटी घेऊन आले होते ?” यात ऑप्शन होते की, सुग्रीव, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. तसं तर याचं उत्तर लक्ष्मण आहे हे साऱ्यांनाच माहितीये. अद्याप 1 लाखांहून अधिक लोकांनी दूरदर्शनच्या या ट्विटर कमेंट केली आहे. परंतु हा प्रश्न पाहिल्यानंतर लगेचच लोकांना सोनाक्षी सिन्हाची आठवण आली होती.

दूरदर्शनच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केली आहे. एकानं लिहिलं की, “दूरदर्शनही मजा घेताना दिसत आहे. एकानं लिहिलं की, याचं बरोबर उत्तर शत्रुची मुलगीच देऊ शकते. एकानं थेट तिचं नाव घेत सोनाक्षी सिन्हाच याच उत्तर देऊ शकते असं म्हटलं आहे.

https://twitter.com/Bittu_Tufani/status/1246477733405683712

केबीसीमध्ये सोनाक्षीनं एका प्रश्नाचं उत्तर न दिल्यानं खुद्द बिग बींनी तिचा क्लास घेतला होता. सोनाक्षीला रामायणावरील एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमलं नव्हतं. बिग बी म्हणाले होते की, “वडिलांचं नाव शत्रुघ्न आहे. तुझ्या चुलत्यांचं नाव राम, लक्ष्मण आणि भरत आहे. तुमच्या घराचं नावही रामयण आहे. तुझ्या भावांची नावंही लव-कुश आहेत. तरीही तुला एका सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.”

https://twitter.com/Vns_Sandeep/status/1246482707959308289

https://twitter.com/AmitTha35693704/status/1246469896113807360

https://twitter.com/RaushanRRajput/status/1246477324113063937