‘अप्सरा’नं गुपचूप लग्न केलं ? उलट्या मंगळसूत्रावरून ‘चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिचा फोटो आणि याच फोटोवर एका कमेंटला तिनं दिलेलं उत्तर. सोनालीच्या कुलकर्णीच्या या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोनाली या फोटोंमध्ये ट्रॅ़डिशनल लुकमध्ये दिसत आहे. या फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसत आहे.

सोनालीनं इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती गुलाबी रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये दिसत आहे. तिच्या नाकात नथ आणि गळ्यात काही दागिनेही आहेत. चाहत्यांचं लक्ष वेधलं ते सोनालीच्या गळ्यातील मंगळसूत्रानं. कारण तिनं हे मंगळसूत्र उलटं घालतं होतं. यावर एका चाहतीनं कमेंटही केली होती. ज्याला सोनालीनं उत्तर दिलं आहे.

सोनालीच्या या फोटोवर एका मुलीनं कमेंट केली की, “अगं ताई तुझं मंगळसूत्रच उलटं झालंय.” सोनालीनं या मुलीला जे काही उत्तर दिलं त्यानं सर्वांना संभ्रमात पाडलं आहे. कारण सोनालीचं लग्न झालं आहे की नाही हेच त्यांना कळत नाहीये. सोनालीनं त्या मुलीला उत्तर देताना म्हटलं की, “लग्नानंतर काही दिवस उलटच मंगळसूत्र घालतात.”

काही दिवसांपूर्वीचं सोनालीनं कुणाल बेनोडेकरसोबत एक व्हिडीओ शेअर करत नवी सुरूवात करत असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून तिच्या लग्नाच्या चर्चांना वेग धरला आहे.

व्हिडीओ शेअर करताना सोनाली म्हणाली होती, “माझ्या पार्टनरसोबत नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. चढ-उतार आणि साहसाठी सज्ज आहे.” सोनालीनं एक अ‍ॅडव्हेंचर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या पार्टनरबद्दल सोनाली बोलली आहे त्याचं नाव कुणाल बेनोडेकर आहे. सोनालीनं त्याचा उल्लेख केलेला नाही. परंतु त्याला पोस्टमध्ये टॅग केलं आहे. कुणाल हा मूळचा लंडनचा आहे परंतु कामानिमित्त तो दुबईत असतो.

 

You might also like