BJP नेता सोनाली फोगाट यांनी अधिकाऱ्याला थप्पड मारत भिरकावली चप्पल ! व्हिडीओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टिक टॉक स्टार आणि भाजप नेता सोनाली फोगाट कायमच चर्चेत असतात. यावेळी सोनाली यांनी असं काही केलं आहे की त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहेत. आता सोनाली फोगाट यांनी मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्याला थप्पड मारली आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनाली फोगाट यांनी अधिकाऱ्याला मारली थप्पड
हरियाणातील हिसारच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप नेता सोनाली फोगाट यांनी एका किरकोळ वादवरून अधिकाऱ्याला थप्पड मारली आहे. सोनाली हिसारमधील एका धान्याच्या बाजाराचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथील मार्केट कमिटीचे सचिव सुल्तान सिंह यांच्यासोबत त्यांची तू तू मैं मैं झाली. हा वाद एवढा वाढला की, सोनाली यांनी सर्वांच्या समोरच अधिकाऱ्याला थप्पड मारली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, अधिकारी सोनाली यांना वारंवार रोखण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सोनाली काही केल्या थांबत नाहीयेत त्या एवढ्या भडकल्या होत्या की, त्यांनी त्या अधिकाऱ्याला थप्पड मारली. दरम्यान मंडईतील हा वाद कशामुळं झाला हे काही अद्याप समोर आलेलं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like