Boys Locker Room च्या व्हायरल चॅटवर ‘भडकल्या’ सोनम कपूर आणि स्वरा भास्कर !

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात सुरु असणाऱ्या या कोरोनाच्या काळात एक अशी बातमी समोर आली आहे ज्यानं पूर्ण देश हैराण झाला आहे. ही बातमी शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. इंस्टावर सूरू असलेल्या Boys Locker Room नावाच्या ग्रुपचे काही चॅटेच स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या चॅटमध्ये ग्रुपमधील मुलं गँगरेपची प्लॅनिंग करताना दिसथ आहेत. सोबतच शाळेतील काही मुलींचे फोटो एडिट करून शेअर केले जाताना दिसत आहेत. ही मुलं अल्पवयीन असल्याचं समजत आहे. यावर आता इंडस्ट्रीतील कलाकराच्या रिअॅक्शन येताना दिसत आहेत. अभिनेत्री सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांनी चिंता व्यक्त करत नाराजीही व्यक्त केली आहे.

सोनम कपूरनं लिहिलं की, “हे प्रकरण म्हणजे पालकांनी दुर्लक्ष करण्याचा परिणाम आहे. यासाठी पालकांना जबाबदार धरायला हवं. कारण त्यांनीच मुलांना महिला आणि माणसांची इज्जत करायला शिकवलं नाही. आणि या मुलांना तर लाज वाटयला हवी.”

स्वरा भास्करनं लिहिलं की, “पुरुषी दूषित विचारसरणीकडे ही मुलं जात आहेत. अल्पवयीन मुलं काही अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याचा प्लॅन करत आहेत. त्यांच्या आई वडिलांची आणि शिक्षकांची इच्छा आहे की, त्यांना मुलं म्हणावं. बलात्काऱ्यांना फाशी देणं पुरेसं नाही. ही बलात्काराी मानसिकता बदलायला हवी.”