आसाममधील ‘त्या’ महिलेला सोनू सूदची रक्षाबंधनाची खास भेट

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सोनू सूदने एका गरजू महिलेला रक्षाबंधनचे खास गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे सोनू पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी पुढे सरसावल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या सोनूने आसाममधील एका गरजू महिलेला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. ट्विटरवर सोनल सिंग या युजरने सोनूला टॅग करत एका महिलेची आर्थिक परिस्थितीमुळे झालेली अवस्था व्हिडीओच्या माध्यमातून दाखविली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनूने रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून नवीन घर बांधून देईन असे आश्वासन दिले आहे .

सोनू सूद सर हे कुटुंब आसाममधील जलपयीगुडी येथील आहे. या महिलेच्या पतीचे निधन झाले असून या महिलेला एक लहान मुलगा आहे. या मुलाचे पोट भरण्यासाठीही या महिलेकडे काहीच नाही. पावसाळ्यात या स्त्रीचे अत्यंत हाल होतात. त्यामुळे तुम्हीच एक आशेचा किरण आहात. शक्य असल्याच या कुटुंबाला मदत करा, असे सोनल सिंग यांनी ट्वीट सोनूला टॅग केले होते. ट्विट पाहिल्यानंतर चला आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी आसाममधील आपल्या बहिणीसाठी नवीन घर बांधुयात, असे रिट्विट सोनू सूदने केले आहे. विशेष म्हणजे सोनूच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like