‘लाईफलाईन’ कट होण्यापुर्वीच SONY नं मागितली ‘माफी’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने सोशल मीडियातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता सोनी वाहिनीने यासंदर्भात माफी मागितली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आज सोनी वाहिनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील यांनी देखील वहिनीला माफी मागण्याची मागणी केली होती. त्यामुळे अखेर सोनी वाहिनीने याप्रकरणी माफी मागितली असून अनावधानाने हा प्रकार घडल्याचे सोनीने स्पष्ट केले आहे.

काय होते प्रकरण
गुजरातहून आलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न आमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारला. त्यानंतर दिलेल्या पर्यायांमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आला होता.

1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3. महाराजा रणजीत सिंह
4. शिवाजी

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like