Sore Throat | घशात होत असेल खवखव तर करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय, ताबडतोब मिळेल आराम

नवी दिल्ली : Sore Throat | पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामुळे अनेकांना घसादुखीचा त्रास होतो. पावसाळ्यात इम्युनिटी कमी झाल्याने व्हायरल इन्फेक्शन होते. वातावरणातील बदल, अशुद्ध व संक्रमित पाणी, थंडी व आद्र्रता आदींमुळे पावसाळ्यात घसादुखीची शक्यता वाढते. यावर काही घरगुती उपाय (Sore throat home remedies) जाणून घेऊया…

गुळणी करणे

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळणी करा. यामुळे घशातील सूज, वेदना कमी होते. दिवसातून २ वेळा गुळणी करा.

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्ण घशातील सूज आणि वेदना कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ते घ्या. (Sore Throat)

मध आणि आले

मध आणि आल्याचा रस मिसळून चाटण तयार करून त्या सेवन करा. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.

बदाम तेल

बदाम तेल हलके गरम करून हलक्या हातांनी घशावर मसाज केल्याने घशाची खवखव कमी होते.

तुळशीचा चहा

तुळशीच्या पानांपासून बनवलेल्या चहामुळे घसादुखी कमी होते.

हळदीचे दूध

हळदीचे दूध घशाची जळजळ आणि वेदना शांत करण्यासाठी उपयुक्त ठरते.

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध पावडर कोमट पाण्यात मिसळून गुळणी केल्याने घशाला आराम मिळतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट,
पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

Black Sesame | बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर कढते ‘या’ काळ्या बियांचे पाणी,
लिव्हर करते मजबूत, 5 फायदे जाणून व्हाल हैराण

Pune Ganeshotsav 2023 | पुणे पोलिसांकडून झोन-1 मधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक उद्या