Sourav Ganguly | सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी ! जाणून घ्या दादाच्या नव्या ‘इनिंग’बाबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sourav Ganguly | बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यांच्यावर इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल समिती (ICC) लवकरच मोठी जबाबदारी देणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपद सौरव गांगुलीला देण्यात येणार आहे. याअगोदर हि जबाबदारी टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि सौरव गांगुलीचा सहकारी अनिल कुंबळे ( Anil Kumble) यांच्याकडे होती.

 

अनिल कुंबळेची 2012 साली वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन क्लाईव्ह लॉयड (Clive Llyod) यांच्या जागी 2012 साली क्रिकेट कमिटीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली होती. यानंतर 2016 साली कुंबळेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आता ही मुदत संपल्यानंतर त्याच्या जागी गांगुलीची (Sourav Ganguly) नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजत आहे. क्रिकेटमधील नियम तयार करणे आणि त्याचे नियमन करणे ही जबाबदारी या समितीकडे असते.

 

BCCI साठी आनंदाची बातमी

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) म्हणजेच ICC ने 2024 ते 2031 या कालावधीत होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांची घोषणा केली आहे. या 8 स्पर्धांपैकी 3 स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालं आहे. भारतामध्ये 2026 साली टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup), 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि 2031 साली वन-डे वर्ल्ड कप (One-Day World Cup) होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांमुळे बीसीसीआयला (BCCI) मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व स्पर्धांसाठी आयसीसी भारत सरकारला 10 टक्के टॅक्स देणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचे (BCCI) 1500 कोटी रुपये वाचणार आहेत.

 

Web Title :- Sourav Ganguly | bcci chief sourav ganguly set to replace anil kumble as technical committee chairman of icc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम? उच्च न्यायालयात कागदपत्रे दाखल

Modi Government | दररोज 7 रूपयांची बचत करून दरमहा मिळवा 5000 रूपये, जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम

IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियाचा ‘मास्टर प्लॅन’

Sanjay Raut | संजय राऊतांचा कंगनाला टोला; म्हणाले – ‘त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, NCB ने तपास करावा’

MPSC Exam | 20 नोव्हेंबरला असणार्‍या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, मार्गदर्शक सूचना जारी

Dr. Bhagwat Karad | विमानातील प्रोटोकॉल तोडत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याने वाचवले प्रवाशाचे प्राण; पीएम मोदींनी दिली शब्बासकी

Pune Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 8.5 लाखांची फसवणूक; पुण्यातील महिला टीसी अधिकाऱ्याला अटक

Gold Silver Price Today | सोने पोहचले 50 हजार रुपयांच्या जवळ, जाणून घ्या चांदीत आज किती आली तेजी?