Sourav Ganguly | बुमराहच्या दुखापतीवर BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुलीनी हि महत्वाची अपडेट, म्हणाले की….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sourav Ganguly | टीम इंडियाचा (India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी 20 वर्ल्ड कपला (T 20 World Cup) मुकणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. कारण सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी (South Africa Series) बुमराला पुन्हा दुखापत झाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे उर्वरित दोन्ही टी20 सामन्यांना तो मुकणार आहे. बुमराच्या वर्ल्ड कप समावेशाबाबत BCCI कडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती जारी करण्यात आली नाही. मात्र BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीनी (Sourav Ganguly) बुमराहच्या बाबतीत एक मोठे विधान केले आहे.

 

काय म्हणाले सौरव गांगुली?
‘जसप्रीत बुमराह अजूनही दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला नाही. वर्ल्ड कपला अजूनही काही वेळ शिल्लक आहे.’ गांगुली (Sourav Ganguly) यांनी भलेही बुमराहच्या बाजूने आणि चाहत्यांना दिलासा देणारे वक्तव्य केले असले तरी, बोलताना त्यांनी अद्याप हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ पुढे काहीही होऊ शकते. तसेच बीसीसीआयला (BCCI) विश्वास नाही की बुमराह वर्ल्डकप खेळू शकतो. निवड समितीने आताच प्लॉन बी नुसार मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांना ऑस्ट्रेलियाला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बुमराहबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

 

जसप्रीत बुमराह तिरुअनंतपूरम टी20 (Thiruvananthapuram T20) नंतर बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत (National Cricket Academy) दाखल झाला. तिथे बीसीसीआयची मेडिकल टीम सध्या त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. बीसीसीआयनं अद्यापही त्याच्या दुखापतीबाबत आणि वर्ल्ड कपमधल्या समावेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे गांगुलीच्या आजच्या विधानानंतर तो पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्याआधी फिट होणार का? पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

Web Title :- Sourav Ganguly | bcci president sourav gangly makes big statement about jasprit bumrahs availability for t20 world cup

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे का दहीचे सेवन? जाणून घ्या ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी काय खावे

Vitamin D Supplements घेत असाल तर जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अजय विटकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 98 वी कारवाई