BCCI मध्ये चालणार सौरभची ‘दादा’गिरी ! गांगुली अध्यक्षपदी तर सचिवपदी जय अमित शहा जवळपास निश्चित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड जवळपास नक्की मानण्यात येत आहे. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये गांगुली सर्वात पुढे असून माजी खेळाडू बृजेश पटेल देखील या रेसमध्ये सामील आहे. मात्र गांगुलीची निवड नक्की समजली जात असून तो या रेसमध्ये सर्वात पुढे आहे.

अध्यक्षपदाबरोबरच अन्य पदांसाठी देखील निवड होणार असून सचिव आणि खजिनदारपदी देखील नवीन व्यक्तींची निवड केली जाणार आहे. मिळलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याची सचिवपदी निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर अरुण धूमल यांची खजिनदारपदी नियुक्ती होणार आहे. अरुण धूमल हे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ आहेत.

या निवडणुकीसाठी आज नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र सर्वांची निवड हि बिनविरोध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या राज्य प्रतिनिधींच्या बैठकीत जय शहा यांची सचिवपदी नियुक्ती करण्याचे नक्की झाले असून अरुण धूमल यांची देखील खजिनदारपदी नियुक्ती जवळपास नक्की झाली आहे.

दरम्यान, 47 वर्षीय सौरव गांगुली सध्या पशसम बंगाल क्रिकेट असोसीएशनचा अध्यक्ष असून त्याची आता या पदावर निवड झाली तर तो सप्टेंबर 2020 पर्यंत तो या पदावर राहणार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like