स्पेनच्या उपपंतप्रधानास कोरानाची लागण

वृत्तसंस्था – जगभरात हाहाकार घालणार्‍या कोरोना व्हायरसमुळं हजारो लोकांचे बळी गेले आहेत. चीन, इटली, अमेरिकेसह जगभरात सर्वत्र कोरोनानं थैमान घातलं आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार स्पेनच्या उपपंतप्रधान Carmen Calvo यास देखील कोरोनानं अटॅक केला असून Carmen Calvo यांची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

भारतात देखील आतापर्यंत कोरोनानं 11 जणांचे बळी घेतले आहेत तर 550 हून अधिक रूग्ण कारोनानं संक्रमिट झाले आहेत. चीन, अमेरिका आणि इटलीमध्ये तर अनेकांचे बळी गेले आहेत.

इटलीत कोरोनाचे थैमान सुरुच, 24 तासात 743 बळी

गेल्या दोन दिवसांपासून इटलीमध्ये कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा कमी कमी होत होता.परंतू मंगळवारी मृतांची संख्या अचानक पुन्हा वाढल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. चोवीस तासात तब्बल 743 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे इटलीत आता मृतांचा आकडा 6820 इतका वाढला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like