‘स्टार डान्सर’ सपना चौधरीला झाली चुकांची ‘जाणीव’, हात जोडून देवाकडे मागितली ‘माफी’

पोलीसनामा ऑनलाईन :हरियाणवी डान्सर आणि बॉलिवूड स्टार सपना चौधरी आपल्या डान्स ठुमक्यांमुळं नेहमीच चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. याशिवाय कधी ती आपल्या ग्लॅमरस फोटोशुटमुळंही चर्चेत येताना दिसते. पुन्हा एकदा सपनाचा एक फोटो समोर आला आहे. परंतु हा फोटो काही तिच्या शुटमधील नाही. एका पोस्टमध्ये तिनं सांगितलं आहे की, तिला तिच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि तिनं यासाठी माफीही मागितली आहे.

View this post on Instagram

तू नाराज तो है अपने इंसान से भगवान.. नहीं तो मंदिरों के दरवाजे बंद ना करता.. सज़ा दे रहा है कुदरत से खिलवाड़ की.. नहीं तो गुरुद्वारों से लंगर कभी ना उठता.. आज उन बारिश की बूंदों से संदेश मिला.. रोता तो तू भी है जब इंसान आंसू बहाता.. माफ़ करदे अपने बच्चों के हर गुनाह.. सब कहते हैं, तेरी मर्ज़ी के बिना तो पत्ता भी नहीं हिलता!!! 🌹🌹🙏🙏

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

सपनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर करत एक पोस्टही लिहिली आहे. ज्यात ती आपल्या चुकांबद्दल माफी मागताना दिसत आहे. तिची पोस्ट वाचल्यानंतर आता चाहतेही इमोशनल होताना दिसत आहेत. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

साईबाबांचा एक फोटो शेअर करत सपना म्हणते, “देवा तू आपल्या माणसांवर नाराज आहेस. नाही तर मंदिरांचे दरवाजे असे बंद नसते करून घेतले. निसर्गासोबत छेडछाड केल्याची शिक्षा देत आहेस. नाही तर गुरुद्वारा मधून लंगर कधीच उठला नसता. आज त्या पावसाच्या थेंबामधून संदेश मिळाला आहे. जेव्हा माणसं अश्रू ढाळतात तेव्हा तूही रडतोस. आपल्या मुलांचा गुन्हा माफ कर. सर्व म्हणतात की, तुझ्या मर्जीशिवाय तर एक पानही हलत नाही.” सध्या सपना चौधरीची ही इंस्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like