फक्त 10 हजार रूपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा 30000 कमवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकांना जेवताना लोणचे लागतेच प्रत्येक खाद्यपदार्थाला लोणच्यामुळे स्वाद येतो. त्यामुळे एखादा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर लोणचे निर्मितीचा व्यवसाय खूप लाभदायक आहे आणि या व्यवसायाची सुरुवात तुम्ही घरातून देखील करू शकता. नंतर याची व्याप्ती वाढल्यावर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता.

जाणून घेऊयात कशा प्रकारे सुरु केला जाऊ शकतो हा व्यवसाय

10 हजार रुपयात सुरु करा व्यवसाय
लोणचे निर्मितीचा हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरु करू शकतात आणि हा व्यवसाय तुम्ही अवघ्या 10 हजार रुपयात सुरु करू शकता. तुम्हाला यातून दर महिन्याला 25 ते 30 हजार रुपए उत्पन्न मिळू शकते. ऑनलाइन पद्धतीने होणारी विक्री, रिटेल विक्री अशा अनेक गोष्टीमुळे हे उत्पन्न वाढू देखील शकते.

900 चौरस फूट एवढी जागा पाहिजे
लोणचे निर्मितीसाठी 900 चौ मी क्षेत्र आवश्यक आहे. लोणचे निर्मिती, लोणचे सुकवणे, लोणचे पॅक करणे इत्यादी कामांसाठी मोकळ्या जागेची गरज आहे. लोणचे जास्त दिवस राहून खराब होऊ नहे यासाठी खूप साफसफाई ठेवावी लागते. जेणेकरून ते जास्त काळ टिकते.

इतका मिळू शकतो नफा
10 हजार रुपये खर्च करून या व्यवसायातून दुप्पट नफा मिळवता येऊ शकतो. पहिल्या मार्केटिंगमध्ये खर्चाची संपूर्ण रक्कम परत मिळते आणि त्यानंतर केवळ नफा होतो. कठोर परिश्रम आणि नवीन प्रयोगांद्वारे हा छोटासा व्यवसाय मोठा व्यवसाय करता येतो. या व्यवसायाचा नफा दरमहा प्राप्त होईल आणि नफ्यात देखील मोठी वाढ होत जाईल.

याबाबतचा परवाना कसा मिळणार
लोणचे निर्मितीच्या प्रक्रियेसाठी परवान्याची आवश्यता लागते. फ़ूड सेफ्टी आणि स्टैंडर्ड आथोरिटी (FSSAI) कडून याबाबतचा परवाना प्राप्त केला जाऊ शकतो. यासाठी ऑनलाइन पद्दतीने देखील अर्ज केला जाऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/