नगरसेवक दिपक पोटेंच्या विकास निधीतून शाळेतील ग्राउंड विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्त्री-शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. नगरसेवक दिपक पोटे यांच्या विकास निधीतून पंडित दीनदयाळ शाळेतील ग्राउंड विकसित करणे व अंतर्गत खोल्या रंगवणे या विकास कामाचा शुभारंभ झाला.

या वेळी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, शिक्षण अधिकारी मांडवे सर, मुख्याध्यापक काकडे मॅडम, चव्हाण मॅडम, पालक संघ सदस्य व प्रभाग १३चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या विकास कामाच्या माध्यमातून शाळेतील वर्ग खोल्या कल्पक रंगसंगतीमध्ये रंगविण्यात येणार आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज मैदान उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी लहान मुलांच्या शारीरिक प्रशिक्षण व जडणघडणीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शाहू लक्ष्मी क्रीडा प्रतिष्ठान चे राज तांबोळी व अनुताई एडके यांचा सन्मान करण्यात आला.

Visit : Policenama.com