42 कोटी ग्राहकांना SBI नं पाठवला अलर्ट ! दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना काळात (Coronavirus) अनेक भामट्यांनी बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे. या बँकिंग फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली. मंगळवारी एसबीआय (SBI) ने एक ट्वीट करत ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एसबीआयने यामध्ये फेक मेसेजबाबत भाष्य केले आहे.

अशाप्रकारे बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) त्याच्या ग्राहकांना नेहमी सतर्क करत असते.

एसबीआयने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना वेळोवेळी सतर्क केले आहे, की बँकेकडून कोणतेही मेसेज त्यांच्या ग्राहकांना पाठवले जात नाहीत. त्याचप्रमाणे बनावट मेल न उघडण्याचा सल्ला देखील बँकेने दिला आहे. दरम्यान, एसबीआयने नुकत्याच केलेल्या या ट्वीटमध्ये असे म्हटलं आहे की, ‘बँक ग्राहकांना अशी विनंती आहे की, सोशल मीडियावर त्यांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही भ्रामक किंवा बनावट मेसेजना बळी पडू नये.

याआधी एसबीआयने एक २० सेकंदाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता, त्यामध्ये एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना याबाबत सावधान केले होते, की तुमची गोपनीय माहिती ऑनलाइन शेअर करू नका.

बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन

एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे, की घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत पोर्टलचाच वापर करा. याशिवाय YONO अॅप वापरून देखील तुम्ही विविध सेवा मिळवू शकता. SBI वेबसाइट किंवा योनो व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या पोर्टलचा वापर केल्यास तुम्ही फसवणुकीची शिकार होण्याची शक्यता अधिक आहे.

सायबर क्राइम पोर्टलवर दाखल करा तक्रार

तुमची फसवणूक झाल्यास तुम्ही सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. नोंदणीवेळी मोबाइल क्रमांक दिल्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी तुम्ही प्रविष्ट केला की नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. या पोर्टलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला राज्याचे नाव लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि OTP टाकावा लागेल. तुम्ही नवीन युजर असल्यास याठिकाणी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.