Steelbird Helmets नं 299 रूपयांपासूनचे फेस शील्ड्सचे 5 वेरिएंट्स केले लॉन्च !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टीलबर्ड हाय-टेक इंडिया लिमिटेडने वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली आहे. स्टीलबर्डने 5 वेगवेगळ्या प्रकारच्या फेस शील्ड बाजारात आणल्या असून कंपनीने कोविड – 19 विरुद्ध देशाच्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी नव्याने सुरुवात केली आहे. स्टीलबर्ड फेस शिल्ड्सला वापरकर्त्यांच्या गरज आणि आवश्यकतेनुसार डिझाइन केले आहेत. ते विविध प्रकारच्या डिझाइन, सुविधा, आकार आणि उपयोग म्हणजेच युज एन्ड थ्रो, स्टॅटिक फेस शिल्डच्या सोबतच सॉफिस्टकेट्ड फ्लिप-अप सुविधेने सुसज्ज आहे. या उपयुक्त वैशिष्ट्यांसह हे फेस शिल्ड मेडिकल प्रोफेशनल्स, फ्रंटलाइन वॉरियर्स ज्यात पोलिस, पॅरा वैद्यकीय कर्मचारी, आरोग्यसेवा कर्मचारी, स्वच्छता कामगार इत्यादीसह मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांसाठीही अगदी अचूक आणि उपयुक्त आहेत. या नव्या सुरूवातीस प्रतिक्रिया देताना स्टीलबर्ड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कपूर म्हणाले की, उत्कृष्ट डिझाइन आणि दर्जेदार वस्तूंची रचना ही स्टीलबर्ड ग्रुपच्याच डीएनएमध्ये आहे. स्टीलबर्डच्या उत्पादनांमध्ये नेहमीच अनेक वैशिष्ट्ये असतात.

स्टीलबर्ड फेस शील्ड बरेच फायदे प्रदान करतात. त्यांची शिल्ड हनुवटीपासून संपूर्ण कानांपर्यंत पसरली आहे, कपाळ आणि कव्हरच्या हेडपीस दरम्यान कोणतेही अंतर नाही. स्टीलबर्ड फेस शील्ड कव्हर्सचा वापर बर्‍याच काळासाठी केला जाऊ शकतो आणि या फेस शिल्डला साबणाने आणि पाण्याने किंवा सामान्य घरगुती सॅनिटायझर्सनी सहज साफ करून आणि वारंवार वापरता येतात. दरम्यान, अत्याधुनिक गुणवत्ता आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनामुळे स्टीलबर्ड फेस शील्डला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून आता येत्या 2 महिन्यांत दररोज 40,000 हून अधिक फेस शील्ड तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. स्टीलबर्डच्या क्वालिटी फेस शील्डला बाजारात जास्त मागणी आहे. देशभरातून येणारी ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी दररोज त्यांचे उत्पादन वाढवत आहे.

फेस शिल्ड्सची इतर वैशिष्ट्ये :
1. हे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वांत लांब फेस शिल्डपैकी एक आहे, जे कोणत्याही व्यक्तीचा संपूर्ण चेहरा कव्हर करतात.
2 . फ्लिप-अप फंक्शन जे कव्हरला वरती आणि खाली करण्याची सुविधा देते.
3. अँटी-स्क्रॅच कोटेड
4. अँटी-फॉगसह उपलब्ध
5. अनब्रेकेबल पॉलीकार्बोनेट शील्ड
6. कपाळावर सोयीसाठी पीयू फोमला सॉफ्ट फॅब्रिकने कव्हर केले आहे
7. वेगवेगळ्या डोक्याच्या आकारासाठी अडजस्टेबल साईज.
8. ऑप्टिकल ट्रू
9. पीक कॅपसह शिल्ड
10. अंदाजे जाडी 2 मिमी
11. युवी प्रिंटेड फीस शिल्ड्स

फेस शिल्ड्स, पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर्स इ. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जीवनरक्षक साधने आहेत आणि या सर्वांवर जीएसटी रद्द करण्याची विनंतीही राजीव कपूर यांनी भारत सरकारला केली आहे. यामुळे त्यांचे दर कमी होतील. त्यांचा वापर प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे आणि म्हणूनच आपल्याला त्याचे दर देखील स्वस्त ठेवावे लागतील. यामधून जीएसटी मागे घेतल्यास त्यांचे दर कमी होतील आणि सर्वसामान्यांना त्या अगदी स्वस्त किंमतीत उपलब्ध होतील. सरकारने ही पावले अतिशय जलद आणि वेगाने घ्यावी लागतील. या फेस शिल्डची किंमत 299 ते 699 रुपयांपर्यंत आहे.