पोलिस चौकीच्या आत विकला जात होता ‘गांजा’ ! विक्रेता म्हणाला – ‘मी महिन्याला 20 हजार रुपये देतो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  यूपीच्या उन्नाव जिल्ह्यातील बाळूघाट पोलिस चौकीवर गांजा विक्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. एसपीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ बाळूघाट चौकी परिसरातील नमामि गंगे घाटातील पोलिस चौकीचा आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, गांज्याची खुलेआम खरेदी विक्री केली जात आहे. खरेदीदार विचारत आहे की, आपण चौकीत गांजा विकत आहात. पोलिसांची भीती वाटत नाही. गांजा विकणार्‍या युवकाने सांगितले की, बाळूघाट चौकी प्रभारी मनोज सिंग यांना महिन्याला 20 हजार रुपये देतो, म्हणून खुलेआम विकतो. तुम्हाला गांजा विकायचा असेल तर बोलणी करू.

दरम्यान, चर्चित चौकी प्रभारी जजमऊ चौकीत असतानाही अनेक कारवायांमध्ये नाव नोंदले गेले. त्यानंतर तो गंगाघाट पोलिस स्टेशनमध्ये जोडला गेला. माजी पोलिस अधिका्यांनी त्याला चौकी प्रभारी बनविले. लॉकडाऊन दरम्यान, गल्लीबोळांत ठेला लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांकडून वसूलचेही प्रकरण उघडकीस आले आहे. पण पैशाच्या पुढे गरीबांचे ऐकले नाही. चौकी प्रभारी अशी बेकायदा कामे करत राहिला. त्यामुळे संपूर्ण विभागास लाजेने मान खाली घालावी लागली. एसपी आनंद कुलकर्णी यांचे म्हणणे आहे की, बाळूघाट पोलिस चौकीमध्ये गांजा विक्रीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेण्यात आली असून संबंधित चौकीवर चौकशी केली जाईल.