कालापानी वादावर चीनने हात झटकले, म्हणाला – ‘भारत आणि नेपाळ यांनी मैत्रीने वाद सोडवावा’

बीजिंग : वृत्तसंस्था – कालापानी सीमेचा प्रश्न भारत आणि नेपाळ यांच्यातील असल्याचे चीनने मंगळवारी सांगितले आहे. तसेच दोन्ही शेजारील देश ‘एकतर्फे पाऊल’ टाकण्यापासून परावृत्त करतील आणि त्यांचा हा वाद मैत्रीपूर्ण मार्गान सोडवतील अशी अपेक्षा असल्याचे चिनने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत ही टप्पणी केली.

झाओ लिजियान हे सीमेवरील भारत-नेपाळ गतिरोध आणि भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या टिप्पणीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. दसऱ्यांच्या सांगण्यावरून नेपाळ नव्याने बांधलेल्या रस्त्यावर आक्षेप घेतल्याचे नरवणे यांनी म्हटले होते.

लिजियान म्हणाले की, कालापानी हा नेपाळ आणि भारत यांच्यातील एक मुद्दा आहे आणि आम्ही अशा करतो की दोन्ही देश त्यांचे वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवतील. नेपाळ आणि भारताने परिस्थिती तणावाची होईल अशी पावलं उचलायला नको, असेही त्यांनी म्हटले आहे.

भारताने लिपुलेख पासपर्य़ंत रस्ता बांधला आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा 80 किलोमीटरचा मार्ग 8 मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानससरोवरला जणाऱ्या भारतीय यात्रेकरूंचा वेळ वाचणार आहे. भारताने लिपूलेख पासपर्य़ंत बांधलेल्या या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला आहे.