लग्नाच्या 2 दिवस आधीच ‘सिंगर’ नेहा कक्करनं मागितली सर्वांची ‘माफी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंगर आणि इंडियन आयडलची जज नेहा कक्कर सध्या आपल्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. सध्या नेहा आणि इंडियन आयडलचा अँकर आदित्य नारायण यांच्या लग्नाचा फॉर्मेट सुरू आहे. चाहत्यांनाही हे आवडत आहे. शोमध्ये सांगितलं गेलं आहे की 14 फेब्रुवारी रोजी इंडियन आयडलच्या सेवटरच त्यांचं लग्न होणार आहे. त्यामुळे चाहते या एपिसोडची आतुरतेनं वाट पहात आहेत. अशात आता नेहा कक्करनं सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे.

का मागितली नेहानं माफी ?

10 फेब्रुवारी रोजी नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांचं गोव बीच हे गाणं रिलीज होणार होतं. परंतु काही कारणास्तव हे गाणं 10 फेब्रुवारी रोजी रिलीज होऊ शकलं नाही. गाणं रिलीज करण्यासाठी वेळ होत असल्या कारणानं नेहा कक्करनं सर्वच चाहत्यांची माफी मागितली आहे. इंस्टाग्रामवरून नेहानं याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/B8Y1mtNHRWN/?utm_source=ig_embed

‘आम्ही तुमची माफी मागतो’ : नेहा कक्कर

आपल्या इंस्टग्राम पोस्टमध्ये नेहा म्हणते, “आम्ही तुमची माफी मागतो. गोवा बीच हे गाणं 11 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. तुम्हा सर्वांच्या धैर्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद.”

https://www.instagram.com/p/B8QmGGCH5ax/

https://www.instagram.com/p/B8Nd_5wHl1o/