राम मंदिर भूमिपूजनाकडं संपुर्ण जगाचं होतं ‘लक्ष’, सर्वाधिक अमेरिका आणि ब्रिटनमधील प्रेक्षकांनी पाहिलं Live ‘प्रक्षेपण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पाच ऑगस्टला संघ प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत अयोध्यामध्ये राम मंदिर बांधकामाचे भूमीपूजन केले. कोरोना महामारीमुळे सोहळ्यात मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, लोक टीव्ही आणि सोशल मीडियाद्वारे या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले. भारतासह जगाचीही नजर अयोध्याकडे लागली होती.

भारताशिवाय राम मंदिर भूमीपूजनचे लाइव्ह प्रसारण ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड, नेपाळसह अन्य देशांमध्ये करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रामुख्याने प्रसारण दूरदर्शनद्वारे करण्यात आले. लाइव्ह टेलीकास्टसाठी मल्टीपल कॅमरा, आऊटसाइड ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल सॅटेलाइट न्यूज गॅदरिंग व्हॅन तैनात करण्यात आली होती. लोकांनी यूट्यूबसह अन्य डिजिटल प्लॅटफार्मच्या माध्यमातून सुद्धा भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहिला.

दूरदर्शननुसार सर्वात जास्त दर्शकांची संख्या संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, नेदरलँड, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड, संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब, ओमान, कुवैत, नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश, मलेशिया, इंडोनेशिया, थायलँड, फिलिपिन्स, सिंगापुर, श्रीलंका आणि मॉरीशसमध्ये होती. भारतात 200 पेक्षा जास्त चॅनल्सने या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले.

समाचार एजन्सी एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या माध्यमातून सुमारे 1200 स्टेशन आणि असोसिएटेड प्रेस टेलिव्हिजन न्यूज (एपीटीएन) द्वारे जगभरातील 450 मीडिया समुहांना प्रसारणाची परवानगी दिली होती.