सावधान ! सकाळी उठताच मोबाईल पाहिल्यानं होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या योग्य ‘रूटीन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या मोबाईलशिवाय कुणाचेच काम चालू शकत नाही. मोबाईलने अनेक प्रकारची कामे सोपी केली आहेत. परंतु, तो व्यसनासारखा सुद्धा झाला आहे. लोकांना फोन वापरण्याची इतकी सवय झाली आहे की, रात्री फोन पहात-पहात झोपी जातात आणि सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या मोबाईल चेक करतात. परंतु, सकाळी उठताच मोबाईल वापरणे आरोग्यासाठी चांगले नाही. सोबतच यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होते.

हे आहेत दुष्परिणाम

1  तणाव आणि चिंता

दिवसाची सुरूवात नेहमी शांततेत करणे चांगले असते. मोबाईलवर येणार्‍या अनेक पोस्ट चिंता आणि तणावास कारणीभूत ठरू शकतात. झोपेतून उठून सोशल मीडिया चेक केल्यास त्यातच मेंदू बांधला जातो आणि नको त्या माहितीने भरला जातो. दिवसाची सुरूवात तणाव आणि चिंतांनी करणे आरोग्यासाठी चांगले नाही.

2  चिडचिडेपणा वाढतो

सकाळी उठताच मोबाईल फोन चेक करत राहील्याने चिडचिडेपणा वाढतो. सकाळीच मोबाईलमध्ये असे काही नकारात्मक पाहिले जाते ज्याचा थेट परिणाम मूडवर होतो. सतत राग येणे ही समस्या यामुळेच होते.

3  कार्यक्षमतेवर परिणाम

या सवयीमुळे मेंदी त्याच विषयाबाबत विचार करू लागतो. यामुळे दुसर्‍या कामात मन लागत नाही. कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

4  डिप्रेशनची शक्यता

रात्री झोपताना आणि सकाळी उठतेवेळी मोबाईल पाहणार्‍यांची स्थिती आणखी खराब होऊ शकते. नियमित असे रूटीन फॉलो करणार्‍यांना डिप्रेशनची समस्या होऊ शकते. सोशल मीडियामुळे आपली तुलना आपण इतरांशी करू शकतो. त्यामुळे अशा समस्या होऊ शकतात.

असे असावे सकाळचे रूटीन

मोबाईलऐवजी सकाळीची सुरूवात अन्य सकारात्मक कामांनी करा. सकाळच्या दिनचर्येचा मेटाबॉलिज्मवर खुप परिणाम होतो.

2  सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबू टाकून रिकाम्यापोटी प्या. यामुळे पाचनतंत्र स्वच्छ राहते. मेटाबॉलिज्म वाढते.

3  नियमित व्यायाम करा. योग, एरोबिक्स, वेट लिफ्टिंग यापैकी कोणताही व्यायाम करा.

मेडिटेशनसुद्धा नियमित करा, यामुळे मन शांत राहते.

5  कुटुंबासोबत बसून वर्तमानपत्र वाचा.