स्पायडरमॅन बनण्याच्या नादात तिन्ही भावांनी स्वःताला ‘कोळी’कडून घेतलं चावून

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  मुलांना सुपरहिरो फार आवडतात, ज्यांना पाहून मुलांना बर्‍याचदा त्यांच्यासारखे व्हावे असे वाटते. अशीच एक घटना बोलिव्हियाच्या चायांता शहरातून उघडकीस आली आहे, जेथे स्पायडरमॅन बनण्याची इच्छा असणाऱ्या तिन्ही भावांनी स्वत: ला विषारी कोळीकडून चावून घेतले. ज्यामुळे शरीरात विष पसरले. त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर देशाच्या आरोग्य मंत्रालयात सचिव व्हर्जिलियो पायत्रो यांनी सर्व पालकांना आपल्या मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

हा कोळी सामान्यपणे अमेरिका, दक्षिण युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका येथे आढळतो. ब्लॅक विडो अंधाऱ्या, कोरड्या ठिकाणी जसे कि गॅरेज, तळघर, आउटडोअर , शौचालय आणि दाट वनस्पती असलेल्या भागात आढळतो. ब्लॅक विडो विषारी असते. संबंध बनवल्यानंतर ती आपल्या जोडीदारास मारून खाऊन टाकते. तिच्या चाव्याव्दारे शरीरात दुखणे, पोटदुखी, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे आणि अशक्तपणा यासारखे लक्षणे उद्भवतात.

अलीकडेच, या तिन्ही भावांनी ब्लॅक विडो प्रजातीच्या कोळीला शोधून काढले आणि काठीच्या सहाय्याने त्याला उचलून एक-एक करून आपल्या शरीरावर ठेवले. ब्लॅक विडो चावल्याने त्यांच्या शरीरात विष पसरले आणि थोड्याच वेळात तिघेही बेशुद्ध पडले. दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हियन राज्यात राहणाऱ्या 8, 10 आणि 12 वर्षाच्या तिन्ही भावांनी सुपरहिरो स्पायडरमॅन होण्यासाठी स्वतःला ब्लॅक विडोने चावून घेतले. त्यांनी स्पायडरमॅन हा चित्रपट पाहिला, ज्यामध्ये नायक पीटर पार्करला ब्लॅक विडो नावाच्या कोळीने चावा घेतला, त्यानंतर तो स्पायडर मॅन बनतो.