फिल्मफेअर अवॉर्डच्या तयारीत ‘मग्न’ होती नोरा फतेही, ट्रॉफी घेऊन् गेला ‘रेमो’, रडू लागली अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि रेमो डिसूझाचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेही हातात पुरस्कार घेऊन भाषण करण्याचा सराव करताना दिसत आहे आणि त्यानंतर रेमो डिसूझा येऊन तिच्याकडून हा अवॉर्ड घेतो आणि म्हणते की हे माझे आहे. रेमो नोराकडून अवॉर्ड हिसकावून घेतो तेव्हा नोरा खाली बसून रडायला सुरुवात करते.

व्हायरल झालेला व्हिडिओ खूप मजेदार आहे आणि हा मनोरंजकाच्या हेतूने तयार केला आहे. व्हिडिओमध्ये सराव करणारी नोरा म्हणाली, ‘मी आयुष्यभर या क्षणाची वाट पाहत आहे. ‘बाटला हाऊस’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ सारख्या चित्रपटांमध्ये माझ्या शानदार अभिनयासाठी अर्थातच मी त्यास पात्र आहे. मला माझी आई, हिंदुस्तान आणि मोरोक्को व माझ्या चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. ‘

या व्हिडिओमध्ये जेव्हा रेमो नोराकडून अवॉर्ड हिककावून घेतो तेव्हा नोरा रडते. हा व्हिडिओ ज्याने रेकॉर्ड केला आहे तो नोरोला म्हणतो की हा अवॉर्ड तुझा आहे का ? यावर, नोरा तिथून निघून जाते आणि म्हणते की, ‘नो कॅमेरा प्लिज’. दोघांचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. नोराने स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मी रेमो डिसोझाबरोबर थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत होते.’ हा व्हिडिओ काही तासांत 1.5 लाख वेळा लोकांना पाहिला आहे.