गरिबीला कंटाळून विष पिऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गरिबीला कंटाळून अभ्यासात हुशार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील शेर्ले राऊतवाडी येथील पांडुरंग प्रसाद राऊत या 16 वर्षीय विद्यार्थ्यांने विष पिऊ आत्महत्या केली आहे. पांडुरंगने दहावीच्या परीक्षेत 85.60 टक्के गुण मिळविले असून गणित, इंग्रजी विषयात लक्षवेधी मार्क्स मिळविले आहेत.

शेर्ले येथील पांडुरंग राऊत या शाळकरी मुलाने 27 जूनला विष प्राशन केले होते. नातेवाइकांनी त्याला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने अखेर बांबुळी गोवा येथे नेण्यात आले. आठ दिवस अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असतानाच प्राणज्योत मालवली.

पांडुरंग हा अभ्यासात हुशार, प्रामाणिक व मेहनती मुलगा होता. घरच्या गरीबीमुळे मात्र तो कायम नैराश्यात असायचा. कुटुंबाची गरीबी कधी संपणार ? असा प्रश्न तो घरच्या मंडळींकडे कायम उपस्थित करत होता. याच नैराश्यातून त्याने विष प्राशन केले व त्यात त्याचा मृत्यू झाला. पांडुरंगला गणित विषयात 94, विज्ञान 91 तर इंग्रजी विषयात 84 मार्क्स आहेत. एकूण 85.60 टक्के गुण मिळवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र, आईवडिलांच्या अपेक्षा अधांतरी ठेवत आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like