विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अ‍ॅपे रिक्षाचा अपघात ; १ ठार ३ जखमी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अ‍ॅपे रिक्षाला झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे घडला. महादेव कारभारी वायबट (वय-१८) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आज सकाळी पिंपरनई येथून भालचंद्र विद्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला एका दुचाकीस्वाराने कट मारला. त्यामुळे रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाने तीन वेळी पलट्या घेतल्या. यावेळी रिक्षामध्ये दहा विद्यार्थी प्रवास करत होते. यामध्ये महादेव हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या अपघातामुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा प्रशासनांनी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासीठी बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

आरोग्यविषयक वृत्त