सकाळी झोपेतून ‘या’ पध्दतीनं जागे झालात तर ‘आळस’ जाईल दूर, दिवसभर राहाल ‘फ्रेश’ ! ‘रिसर्च’मधील 3 निष्कर्ष जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – सकाळी झोपेतून तुम्ही जागे कसे होता, यावर खुपकाही अवलंबून असते. चुकीच्या पद्धतीने दिवसाची सुरूवात झाली तर दिवसभर आळस जाणवतो. शिवाय तुमच्या रोजच्या कामांवर परिणाम होतो ते वेगळाच. काही वेळा गाढ झोपेतून जागे होताना खुप त्रास होतो. अशावेळी आलार्म बंद करून काहीजण पुन्हा झोपतात. मात्र, झोपमोड करून तुम्ही उठलात तर सुस्ती, आळस जाणवतो. ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर रिसर्च केला आहे. पीएलओएस वन नावाच्या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे.

संशोधकांनी सांगितला हा फंडा
झोप होत नसेल, सुस्ती, आळस जाणवणे, फ्रेशनेस वाटत नसेल तर सुमधूर संगीताचा अलार्म तुमच्यासाठी खुप लाभदायक ठरू शकतो. झोपेतून उठण्यासाठी सुमधूर संगीत असलेला अलार्म लावला तर सुस्ती जाईल आणि दिवसभर मूडसुद्धा चांगला राहील.

रिसर्चमधील निष्कर्ष

1 म्युझिकल अलार्म ऐकून झोपेतून जागे झालात तर सजगतेचा स्तर वाढेल. म्हणजे तुम्ही जास्त अलर्ट राहू शकता.

2 आलार्मच्या बिप बिप किंवा कर्कश आवाजाने मेंदूची गतिविधी भ्रमित होते. तर सुमधूर आवाजाच्या व्हायब्रेशनने चांगल्या प्रकारे झोपेतून उठू शकता.

3 जास्त मेहनतीचे किंवा जास्त स्ट्रेसचे काम करणार्‍यांसा म्युझिकल अलार्म ऐकून उठणे खास ठरू शकते. सुमधूर संगीताने डोकं शांत राहते. दिवसही चांगला जातो.