Success Story : शेतकर्‍याच्या मुलानं ज्योतिषाचं ‘भाविष्य’ ठरवलं खोटं, पहिल्याच प्रयत्नात बनला IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीसएसी ही परिक्षा अत्यंत अवघड परिक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो लोक या परिक्षेला बसतात परंतु अत्यंत कमी लोक ही परिक्षा पास होऊ शकतात. अशाच एका परिक्षार्थीने 2018 मध्ये कष्ट घेत अभ्यास केला आणि यूपीएससीच्या परिक्षेत 316 वी रँक मिळवली. या यशवंताचे नाव आहे नवजीवन विजय पवार.

नवजीवन पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी ज्योतिषीचा दावा खोटा ठरवंत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परिक्षा पास केली. शेतकऱ्यांच्या मुलाने नवजीवनने ना की फक्त ज्योतिषीचा दावा खोटा ठरवला तर मुख्य परिक्षेदरम्यान डेंग्यू झाला असताना कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय यश मिळवले.

नवजीवन पवार यांचा यशाचा प्रवास –
नवजीवन विजय पवार महाराष्ट्रातील आहे. त्यांचे वडील शेतकरी आहेत तर आई शिक्षिका आहे. ते पहिल्यापासून अभ्यासात हुशार होते. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिवील इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीत जाऊन सुरु केली परिक्षेची तयारी –
नवजीवन यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेले. येथे जाऊन त्यांनी परिक्षेची तयारी सुरु केली. परंतु तेथे त्यांनी परिक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लास लावले नाही. स्वता: परिक्षेचा अभ्यास सुरु ठेवला.

मुख्य परिक्षेवेळी झाला होता डेंग्यू-
नवजीवन यांनी एका मुलाखतीत सांगितले की मुख्य परिक्षेच्या एका महिन्यापूर्वी यांना डेंग्यू झाला होता, रुग्णालयात डॉक्टर एका हाताला इंजेक्शन देत होते तर दुसऱ्या हातात पुस्तक होतं. 15 दिवस नवजीवनला डेग्यूतून बरे झाल्यावर पुन्हा दिल्लीत अभ्यासासाठी गेले परंतु ते अत्यंत तणावत होते. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना हिंम्मत दिली.

2018 मध्ये मिळेल यश –
त्यानंतर 2018 मध्ये नवजीवन यांच्या प्रयत्नाला यश आले त्यांनी यूपीएससीची परिक्षा पास होतं 316 वी रँक मिळवली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/