लिंबाची साल तुम्हाला देईल सांधेदुखीपासून कायमचा आराम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लिंबू आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे केवळ वजन कमी करण्यातच नव्हे तर सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी देखील मदत करते. लिंबाची साल सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपचार म्हणून वापरली जाते.

वाढत्या वयातील सांध्यातील वेदना ही एक सामान्य समस्या आहे. शरीराच्या कोणत्याही भागात सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरातील कोणत्याही ३६० जोडलेल्या भागात सूजल्याने वेदना जाणवते. अशा परिस्थितीत लिंबाची साल कोणत्याही रामबाण औषधापेक्षा कमी नाही. लिंबाच्या सालीने सांध्यातील वेदना कशा दूर करायच्या ते जाणून घेऊया.

सांध्यातील दुखण्यामध्ये लिंबाची साल कशी काम करते

लिंबूमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन, बी १, बी ६ आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते. तसेच, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. लिंबाच्या सालामध्ये आढळणारे गुणधर्म रक्तवाहिन्यांना आराम देतात. हे हाडे मजबूत करून आणि सांध्यातील वेदना कमी करतात. इतकेच नाही तर लिंबू हाडांच्या आजारांशी संबंधित वेदना देखील कमी करतात जसे की ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि पॉलिआर्थरायटिस.

सांध्यातील वेदना कमी करण्यासाठी

पद्धत १

–  दोन मोठे लिंबू चांगले धुवून सोलून घ्या.
–  लिंबाच्या साली किसून घ्या. हे लक्षात ठेवा की आपल्याला केवळ लिंबाचा पिवळा भाग म्हणजे सालीचा भाग घ्यायचा आहे, पांढरा भाग नाही.
–  सांध्यावर किसलेले साल लावणे आणि मलमपट्टी लावावी
–  दोन तासांनंतर पट्टी काढून टाकावी. सांधेदुखीपासून आराम मिळेल.

पद्धत २

–  दोन मोठ्या लिंबाची पिवळी साल काढा.
–  ही साल चांगले किसून घ्या.
–  आता किसलेली साल एका स्वच्छ बरणीत काढून घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईल घाला.
–   बरणी बंद करा आणि दोन आठवडे तसेच ठेवा
–  सांध्यावर ऑलिव्ह ऑईलमध्ये भिजवलेल्या लिंबाची साल लावा आणि पट्टी लावून ठेवा.
–  पट्टीवर प्लास्टिकचे आवरण लावून घ्या जेणेकरून ऑलिव्ह ऑइल आपल्या त्वचेवर पसरणार नाही.
–  वेदनादायक भाग उबदार ठेवण्यासाठी, प्लास्टिक वर लोकरीचे कापड गुंडाळा.
–  लिंबाची साल आणि ऑलिव्ह ऑईलचा परिणाम आपल्या त्वचेपर्यंत खोलवर पोहोचेल आणि सांध्यातील वेदना कमी होईल.

लिंबाचा रस हा सांधेदुखीसाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. विशेष म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्याचा परिणाम प्रभावित भागावर खोलवर होतो, जो सांध्याच्या वेदना होण्यापासून मुक्त होतो.