प्रेमप्रकरणातून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   एका 22 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide-hanging-young-woman) केली आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक परिसरात ही घटना घडली आहे. मयत तरुणीला तिच्या प्रियकराच्या आईने वाममार्गाला लावेन अशी धमकी दिल्यामुळे तीने आत्महत्या केल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.

नमिता इंगोले (वय 22, रा. क्रांतीचौक परिसर) असे आत्महत्या केलल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी विनोद खेत्रे, अनिता खेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून विनोद खेत्रे नावाच्या तरुणासोबत मयत तरुणीचे प्रेमप्रकरण सुरु होते. याची कुणकुण विनोदच्या आईला लागल्यानंतर तीने शिवीगाळ करून तूला वाममार्गाला लावेन, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी मयत तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्य़ादीवरून विनोद व त्याच्या आईवर तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक गजानन सोनटक्के तपास करत आहेत.