इंदापूरात 35 वर्षीय तरुणाची गळफास घेवुन आत्महत्या

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदहद्दीतील व्यंकटेशनगर येथे राहत्या घराच्या टेरीसवरील काॅलमच्या गजाला एकाने बेडशिटच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबतची माहीती मयत इसमाचे चुलत सासरे सादीक इब्राहीम बागवान रा. व्यकटेशनगर इंदापूर,जि.पूणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

जुबेर इरफान बागवान (वय ३५) सध्या रा. व्यंकटेशनगर इंदापूर जि.पूणे व मुळ रा.वैराग ता.बार्शी जि.सोलापूर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन जुबेर बागवान हा गेल्या सात- आठ वर्षापासुन आपले मुळ गाव सोडुन इंदापूर येथे सारवाडीत कुटुंबासह वास्तव्यास होता.इंदापूर येथे तो फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता.जुबेर हा रात्री जेवण झाल्यानंतर चुलत सासरे सादीक बागवान यांच्या घराच्या टेरीसवर झोपत असे.

रविवार दि.१२ जुलै रोजी सकाळी ९:३० वा.चे.सुमारास सादीक बागवान यांची सुन आसमा बागवान ही जुबेर यास टेरीसवर नास्ता देण्यासाठी गेली असता तीचा अचानक जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील सर्वजन टेरीसवर जाउन पाहीले असता जुबेर हा टेरीसवरील काॅलमच्या दहा एम.एम.चे गजाला बेडसीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दीसुन आले.याबाबत जुबेरचे चुलत सासरे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात माहीती दीली.पोलीसांनी घटनास्थळी येवुन जुबेरला उपचारार्थ इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी जुबेर बागवान हा मयत झाल्याचे घोषीत केले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.