दुथडी भरलेल्या गोदावरी नदी पात्रामध्ये त्यानं आयुष्याचा प्रवास संपविला !

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यातील विटा बुद्रुक येथे मन हेलावणारी घटना रविवारी सायंकाळी समोर आली. विटा बुद्रुक येथील चालक असलेले तुकाराम महादु तूपसमुद्रे अंदाजे वय ( 36) यांनी गावालगतच असलेल्या तुडुंब भरलेल्या गोदा पात्रांमध्ये पुलावरून उडी घेत आपल्या जीवन यात्रेचा प्रवास संपविला.

बेरोजगारी व कुटुंब प्रपंचाची विवंचना यातून आलेल्या नैराश्‍यातून चालक तुकाराम तूपसमिंद्रे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन, अनलॉक, कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदींचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. यातूनच आलेल्या नैराश्यातून तुकाराम तूपसमुद्रे यांनी गावालगत असलेल्या नदीपात्र वरील पुलावरून शेवटचा प्रवास केला.

चप्पल पुलावर सोडून गोदावरी नदी पात्रात पुलावरून उडी घेतली. त्यांचं शोध घेण्यासाठी चार पथक तैनात करण्यात आले. घटनास्थळी शोध घेण्याचा प्रयत्न केला. काल रात्री पासून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गोदाकाठच्या गावातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन भाऊ एक बहीण चार मुले आहेत. पाथरी चे तहसीलदार एसबी कट्टे मंडळाधिकारी प्रकाश गोवंदे तलाठी मिलिंद विटेकर, पोलिस यंत्रणा अग्निशमन दलाचे जवान नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.