Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ महत्वाचे बदल; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sukanya Samriddhi Yojana (SSY) | मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) वेगवेगळ्या बचत योजना (Savings Plan) राबवल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि उच्च व्याजदर प्रदान केले जातात. जेणेकरून लोकांना या योजनेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळून मुलींचे भविष्य सुरक्षित करता येईल. अशी एक सरकारने सुकन्या समृद्धी (Sukanya Samriddhi Yojana (SSY) योजना सुरु केली. याचा फायदा देशातील मुलींना होत आहे. या योजनेनुसार मुलींचे उच्च शिक्षण, लग्न इत्यादीसाठी या योजनेत गुंतवणूक करून मोठा निधी गोळा करता येतो. आता सरकारने जास्तीत जास्त नागरीकांना जोडण्यासाठी या योजनेत अनेक महत्वाचे बदल केले आहेत. (Changes In Sukanya Samriddhi Yojana – SSY)

 

सुकन्या समृद्धी योजनेनुसार Sukanya Samriddhi Yojana (SSY) मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करून तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर करोडपती होऊ शकते. तुम्हाला देखील या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्यापूर्वी हे सरकारने केलेले बदल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे.

 

 

सुकन्या समृद्धी योजनेत केलेले बदल –

 

– या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पालकांना आधी फक्त 2 मुलींच्या खात्यावर आयकरातून सूट देण्यात आली होती.

आता त्यात बदल करून तिसऱ्या मुलीसाठी सूट लागू करण्यात आली आहे. ज्यांना पहिली मुलगी

झाल्यानंतर दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्या, त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

 

– तसेच, खातेधारक मुलगी दहा वर्षांची झाल्यानंतरच तिचे खाते चालवू शकते. पण आता वयाची 18 वर्षे

पूर्ण केल्यानंतरच ती हे करू शकणार आहे. मुलीचे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत फक्त आई-वडील अथवा पालक हे खाते ऑपरेट करू शकतील.

 

– पहिला नियम असा होता की या खात्यात दरवर्षी किमान 250 रुपये जमा झाले नाहीत तर खाते डिफॉल्ट झाले असते.

पण आता ते होणार नाही. मुदतपूर्तीपर्यंत जमा केलेल्या रकमेवर व्याज दिले जाईल. मुलीचे मुदतपूर्तीपूर्वी निधन झाल्यास

अथवा तिचा पत्ता बदलल्यास या योजनेचे खाते बंद केले जाऊ शकते. मात्र आता मुलीला जीवघेणा आजार झाला

तरी खाते बंद केले जाऊ शकते. पालकांचे निधन झाले तरी खाते आधी बंद केले जाऊ शकते.

 

– सध्या सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते.

यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत मिळते.

 

 

Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक

Stock Market | गुंतवणूकदारांना दिलासा ! आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी

BSNL Best Recharge Plan | बीएसएनएलचा बेस्ट प्लॅन ! 797 रुपयांत SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह अनेक सुविधा