माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपचे 353 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

इंदूर : वृत्तसंस्था – सत्ताधारी काँग्रेसविरोधातल्या भाजपच्या आंदोलनानंतर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आंदोलन करणाऱ्या भाजपच्या 353 कार्यकर्त्यांसह पोलिसांनी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं आहे. जिल्हा तुरुंग अधीक्षक अदिती चतुर्वेदी यांनी याबाबत माहिती दिली आहे. मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष राकेश सिंग यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या नेत्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांसह खासदारांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात आणि सीएएच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीनंतर ही कारवाई करण्यात आली. भाजपनं कलम 144 चं उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या आंदोनातील भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन जिल्हा कारागृहात नेलं आणिन नंतर सोडून दिलं. यात भाजपचे मध्य प्रदेश अध्यक्ष राकेश सिंग, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, इंदूरचे खासदार शंकर ललवानी, आमदार आणि इंदूरच्या महापौर मालिनी सिंग यांचाही समावेश होता.

पश्चिम पोलीस अधीक्षक अवधेश कुमार गोस्वामी याबाबत बोलताना म्हणाले, “भाजप कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालून बॅरिकेड्स काढण्याचे प्रयत्न झाले. काही गोंधळ होऊ नये म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं” असंही त्यांनी सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा –