Supreme Court । ‘कोरोना मृतांचे मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – मागील काही महिन्यापासून भारतात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेमुळे लोकांची परिस्थिती बिकट करून टाकली आहे. कोरोनाच्या भयानक विषाणूने देशात लोकांच्या मृत्यूचे (Death) प्रमाण देखील अधिक झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र (Death Certificate) देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी मार्गदर्शक सूचना (Guidelines) तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) म्हटलं आहे की, ‘कोरोनाने ज्या लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत केंद्र सरकारने (Central Government) स्पष्ट केलेली प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. तसेच ज्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र (Death Certificate) आधी जारी केले गेले आहे, मात्र, मृत्यूचे कारण कोरोना म्हणून नोंदलेले नाही, त्यांच्यामध्ये सुधारण्याची एक प्रणाली असावी, जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांना घोषित योजनांचा लाभ घेता येईल, यामुळे कोरोना मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, असं सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) सांगण्यात आलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या दरम्यान, 21 जून रोजी झालेल्या सुनावणीवेळी, कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (NDMA) 4 लाखांचे नुकसान भरपाई न देण्याबाबत काही निर्णय झाला होता का, असा प्रश्न कोर्टानं (Supreme Court) केंद्राला केला होता. या 4 लाख रुपयाच्या नुकसान भरपाईच्या मागणी बाबत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टानं (Supreme Court) आपला निर्णय राखून धरला होता. तसेच, याचिकेमध्ये मृत्यूप्रमाणपत्रात (Death Certificate) कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्याची मागणी देखील केली होती. यासंदर्भात कोर्टानं (Supreme Court) मृत्यूप्रमाणपत्रा संदर्भात एक धोरण तयार करण्याची सूचना दिली होती.

तसेच, 21 जून रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान. न्या. एम. आर. शाह (Justice M. R. Shah) यांनी केंद्र सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehta) यांना म्हटले की, कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया प्रथमदर्शनी सर्वात क्लिष्ट आहे. ही प्रक्रिया सोपी असावी. एवढेच नाही, ज्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेले आहे, मात्र, मृत्यूचे कारण कोरोना म्हणून नोंदवले गेले नाही, तेथे सुधारण्याची प्रणालीही असावी, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.

Web Title :- Supreme Court | facilitate the process of issuing death certificate to corona supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू