‘चौकीदार चोर है’ विधानाबाबत राहुल गांधींना सक्त ‘ताकीद’, सुप्रीम कोर्टानं केलं ‘माफ’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची माफी मान्य केली. त्याचप्रमाणे न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की आता राहुल गांधी यांच्या विरोधात कोणताही अवमान प्रकरनातील खटला चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की घटनात्मक पदांवर असलेल्या लोकांनी समजदारीने वक्तव्य करायला हवे. राजकीय वादात कोर्टाला खेचणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी मागितलेल्या माफीला आम्ही मंजुरी दिली असल्याचे देखील न्यायालयाने सांगितले.

राहुल गांधी यांनी वक्तव्यामध्ये ‘चोकीदार चोर आहे’ यामध्ये न्यायालयाचा देखील उल्लेख केला होता. यासंदर्भात भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, राहुल गांधी यांनी मुद्दाम वारंवार हे वक्तव्य केले होते. तसेच राहुल गांधींची माफी मंजूर करत न्यायालयाने भविष्यात अशा गोष्टीबाबत लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.

काय आहे नेमका प्रकार ?
राहुल गांधी यांच्यावर आरोप करण्यात आला होता की, राफेल डील बाबत वक्तव्य करताना गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तोडून मोडून सोयीस्कररीत्या सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका भाजप खासदारांकडून करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांची माफी मंजूर केली आहे.

Visit : Policenama.com