सुप्रीम कोर्टानं बदलला जगन्नाथ यात्रेचा निर्णय, अखेर दिली परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ओडिशातील भगवान जगन्नाथ रथयात्रा रद्द करण्याचा निर्णय बदलून सुप्रीम कोर्टाने अखेर यात्रेस परवानगी दिली आहे. कोर्टाने आदेश देत म्हंटले कि, सुप्रीम कोर्ट रथयात्रा मायक्रोमॅनेज करणार नाही. जगन्नाथ मंदिर समिती आणि राज्य सरकार त्यास सहकार्य करेल. त्याचप्रमाणे जगन्नाथ यात्रेत लोकांची गर्दी होणार नाही, याची खात्री ओडिशा सरकारनं दिली आहे. तरी यात्रेमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही, अशी काळजी घेण्यात यावी, असंही सुप्रीम कोर्टानं संबंधित प्रशासनाला बजावलं आहे.

जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीच्या म्हणण्यानुसार, राज्यातील मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ते या रथयात्रेचे आयोजन करणार आहे. तसेच यात्रा समिती तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधणार आहे. दरम्यान, देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुप्रीम कोर्टानं यंदाच्या भगवान जगन्नाथांची रथयात्रा रद्द केली होती. कोर्टानं यात्रा करत आपल्या आदेशात म्हंटल होत कि, यात्रेली परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला क्षमा करणार नाही.

मात्र, कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयावर पुर्नविचार करावा, असं या याचिकेत म्हटलं गेलं होतं. माहितीनुसार, यात्रा काढण्याबाबत 16 याचिका दाखल करण्यात आल्या असून न्यायाधीश एस. रवींद्र भट त्यावर पुर्नविचार करणार असल्याचं सांगण्यात येत होतं.

दरम्यान, भगवान जगन्नाथ रथ यात्रा ओडिशातील जगप्रसिद्ध यात्रा आहे. यावर्षी 23 जून रोजी ही यात्रा सुरू होणार होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं या यात्रेवर बंदी घातली होती.